web-ads-yml-728x90

Breaking News

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आयोजन समितीची बैठक संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत महोत्सव आयोजन समितीची प्रथम बैठक दूरस्थ माध्यमातून संपन्न झाली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे राजभवन येथून बैठकीला उपस्थित होते. बैठकीत गृहमंत्री तथा राष्ट्रीय अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष अमित शाह,  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार आणि सुमित्रा महाजन, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, मल्लिकार्जुन खरगे, भाजपचे अध्यक्ष जे पी. नड्डा, मौलाना वहिदुद्दिन खान यांनी चर्चेत सहभाग घेतला.

No comments