0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत गडचिरोली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ जहाल नेत्यासह पाच नक्षलवादी ठार झाले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस दलातील सी-60 जवानांचे विशेष अभिनंदन केले.या भागात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे. त्यांचा पूर्णपणे बीमोड करण्यासाठी हे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

Post a comment

 
Top