0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा  समाजाच्या सर्व स्तरांमधील जनतेच्या हिताचा असून यात एक प्रकारे सर्वसमावेशक प्रगतीचा संकल्प सरकारने मांडला असल्याची प्रतिक्रिया पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पातील सर्व तरतुदींचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे. जगाचा पोशींदा असणाऱ्या बळीराजाला तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची योजना ही शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कृषी व कृषीवर आधारित योजनांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या असून याच्या जोडीला समाजाच्या विविध स्तरांमधील नागरिकांना विकासाची फळे मिळावीत म्हणून तरतुदी केल्या आहेत. यात महिलांसाठी अतिशय क्रांतीकारी असे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत. सरकारने कोविडग्रस्तांसाठी जिल्हा पातळीवर रूग्णालय आणि पोस्ट-कोविड रूग्णांना समुपदेशनाची उपलब्ध केलेली सुविधा देखील महत्त्वाची आहेच. यंदा पाणी पुरवठा व स्वच्छता खात्यालाही 2 हजार 533 कोटी रूपयांचा निधी मिळाला असून यातून राज्यातील कुणीही तहानलेला राहणार नाही हा विश्‍वास आहे. एकंदरीत पाहता चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाचे हित या अर्थसंकल्पातून साधले जाणार असल्याचा विश्‍वास मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

Post a comment

 
Top