web-ads-yml-728x90

Breaking News

‘कौशल्य विकास रथ’ देणार कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते अभ्यासक्रम, योजना राबविल्या जातात, याचा लाभ मिळविण्यासाठी कोठे संपर्क साधावा, महास्वयम संकेतस्थळाद्वारे रोजगार कसा मिळवावा अशा विविध प्रश्नांसंदर्भात माहिती देण्यासाठी आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील 355 तालुक्यांमध्ये कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचे समुपदेशनही यामार्फत केले जाणार असून यासाठी तयार करण्यात आलेल्या 7 कौशल्य विकास रथांना झेंडा दाखवून कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री श्री. नवाब मलिक यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला.सोच मल्टिपर्पज सोसायटीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी रथांच्या शुभारंभाबरोबरच ‘स्किल टू लाईव्हलिहूड कार्निव्हल’ या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी पाटील, सोच मल्टिपर्पज सोसायटीच्या सचिव पल्लवी गांगुर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. नॉमदेव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments