0

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायतीची मुदत संपल्यावर नगरपंचायतीची भाजपा बॉडी बरखास्त झाली परंन्तू प्रत्येक प्रभागात इटेंडर मॅनेज करून कामाच्या उदघाटणाचा सपाटा भाजपा आमदार खासदार यांनी चालवला असुन कार्यक्रमाला भाजपाचा तंबुच दिसतो भाजपाच्या हातात नगरपंचायत बॉडी बरखास्त झाल्या वरही टक्केवारीची ठेकेदारी केली जात असुन मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पारितोष कंकाल .. हालवत फिरत आहेत.

  एका माजी नगराध्यक्षाच्या हातात आमदार खासदारानी ठेकेदारीची सुत्र देवुन कार्यक्रम उदघाटणाला खर्चाचा भार त्याच्यावर सोपावला तर नाही ना? अशी चर्चा आहे.खासदाराचा निधी ग्रामीण भागात खर्च होण्याएैवजी नगरपंचायत श्रेत्रात खर्च होतो त्यावर नागरिकानी तिव्र नाराजी व्यक्त केली असुन भाजपाच्या बेलगाम एकाच रस्त्यावर पुन्हा पुन्हा इटेंडर काढणार्‍याना विरोध करण्यास कोणी पुढे येत नाही याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे.मुरबाड नगरपंचायत हद्दीत घाणीचे साम्राज्य आहे आरोग्य यंत्रणा नाही कोव्हीड सेंन्टर नाही मात्र कोरोनावर निधी खर्च होत आहे.नगरपंचायत गरीबाना वेठीस धरून मास्क वापरण्यास कोणी चुकल्यास त्याला दंड करतात मात्र भाजपाच्या उदघाटण कार्यक्रम कार्यकर्ते नेत्याच्या समारंभाना हजारो लोक उपस्थित असतात त्यावर कारवार्इ होत नाही निवडणुकीत सत्ता मिळवुन सामान्य जनतेला वेठीस धरून मनमानी काम करणार्‍या भाजपा कारभाराला महाविकास अघाडी शासन जाब विचारत नाहीत अधिकारी भाजपा सत्ताधार्‍याना इशार्‍यावर .. हालवत फिरत आहेत.

         

Post a comment

 
Top