web-ads-yml-728x90

Breaking News

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - बारामती

बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.बारामती  येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.

No comments