web-ads-yml-728x90

Breaking News

वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या वर्धित वेग कार्यक्रमाअंतर्गतच्या जुन्या मंजुर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्यात यावी तसेच ही कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.उस्मानाबाद येथील उमरगा तालुक्यातील मुरुम येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सह सचिव श्री. हजारी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उस्मानाबाद येथील कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांच्यासह मुरुम नगरपरिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments