web-ads-yml-728x90

Breaking News

भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य उज्ज्वल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नव्या पिढीमध्ये नृत्यकलेबद्दल विशेष आस्था दिसून येत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या योग, संगीत व कलेच्या सांस्कृतिक ठेव्याकडे आहे. अशा वेळी, नृत्यकलांचा प्रचार व प्रसार झाला व त्यात संशोधन झाले तर सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांचे भवितव्य अतिशय उज्ज्वल राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.श्री श्री सेंटर फॉर अडव्हान्स्ड रिसर्च इन कथक, श्री श्री विद्यापीठ, कटक व इंदोर येथील नटवरी कथक नृत्य अकादमी यांनी संगीत नाटक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या २ दिवसीय आंतरराष्ट्रीय कथक परिषदेचे उद्घाटन आज राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले.मध्य प्रदेशच्या संस्कृती, पर्यटन व अध्यात्ममंत्री उषा ठाकूर, कथक गुरु महामहोपाध्याय डॉ पुरू दधीच, श्री श्री विद्यापीठाच्या अध्यक्षा रजिता कुलकर्णी, कुलगुरू डॉ. अजय कुमार सिंह, रतिकांत मोहपात्रा, विद्या कोल्हटकर, डॉ. मंजिरी देव तसेच कथक क्षेत्रातील संशोधक परिषदेला उपस्थित होते.

No comments