web-ads-yml-750x100

Breaking News

संत नामदेव महाराजांच्या जन्मगावी स्मारक बांधकाम कामाला गती द्या – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे त्यांचे स्मारक बांधण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती साजरी करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयेाजित करण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

 

No comments