web-ads-yml-728x90

Breaking News

नाशिकच्या कोरोना परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोनाविषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, कोविडचे लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिले.

No comments