web-ads-yml-728x90

Breaking News

शाश्वत विकासासाठी निसर्गाचे पावित्र्य जपणे आवश्यक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भारत हा अनादी काळापासून निसर्गपूजक देश आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांना आपल्या परंपरेत देवत्व दिले आहे. आज पर्यावरण व हवामानातील मोठ्या बदलांमुळे अनेक संकटे निर्माण होत आहे. या संकटांवर मात करून शाश्वत विकास साधायचा असेल तर सर्वांना निसर्गाचे पावित्र्य जपावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.गोवर्धन इको व्हिलेज व सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांनी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पर्यावरण बदल या विषयावर भारत-अमेरिका परिषदेचे आयोजन केले, त्यामध्ये दूरस्थ माध्यमातून सहभागी होताना राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.या ऑनलाईन परिषदेत गोवर्धन इको व्हिलेज प्रकल्पाचे संस्थापक राधानाथ स्वामी, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रांझ, उद्योगपती अजय पिरामल, भारताचे न्युयॉर्क येथील वाणिज्यदूत रणधीर जयस्वाल तसेच सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

No comments