web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयातील भ्रष्टाचारावर महाविकास अघाडीचा पडदा सामान्य जनतेला वेठीस धरून सत्ताधारी - विरोधीपक्षाचे राजकारण

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयात गेले कित्येक वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे जिल्हापरिषद ठाणे अंतर्गत सर्व विभाग तालुका कृषी विभाग वनविभाग विद्युत महामंडळ पाटबंधारे विभाग औद्यौगिक विकास महामंडळ नगरपंचायत इटेंडर अन्य शासकीय विभागात गैरव्यवहार भ्रष्टाचार मनमानी हुकूमशाही टक्केवारी कारभार सुरू आहे त्यावर भाजपा बरोबर सत्ताधारी महाविकास अघाडीच्या लोकप्रतिनिधी मंत्री नेत्यानी पडदा टाकला आहे.शासनाच्या शासकीय भुखंडावर व्यापारी गाले इमारती बांधुन त्यांची विक्री केली आहे.शासकीय पातळीवर चौकशाचा फार्स दाखवुन पोर्टल सरकार पासून स्थानिक कार्यालया पर्यंत काहीही कारवाइ झालेली नाही केवळ सामान्य जनतेच्या तक्रारीना केराची टोपली दाखवुन प्रशासक अधिकार्‍याना आपल्या हुकूमाचे बळी असे राजकारण चालले आहे.ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात रस्त्याची चाळन झाली आहे.आपल्या समर्थक कार्यकर्त्याना ठेकेदारी वाटून राजकारण पक्षाचा झेंडा सुरळीत चालवण्याचा ठेकेदारी धंदा सुरू आहे.आपल्या मतलबी पक्षाच्या आदेशाचे आंदोलन केले जातात त्याला सामान्य जनतेसाठी लढतोय असा भास निर्माण केला जात असुन सामान्य जनतेने शेतकर्‍यानी समस्याग्रस्तानी अशा ठोंगी ठेकेदारीवर आपण राजकीय दुकान चालवणार्‍यावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.ठाणे जिल्हयात सर्वात जास्त भ्रष्टाचार मनमानी इटेंडर मॅनेजमेन्ट सामान्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष राजकारण मुरबाड तालुक्यात सुरू असुन सत्ताधारी तसेच विरोधक दोघांची ठेकेदारी सुरू असल्याने तुझ्या गळया माझ्या गळया तुझ्या मुळचा भ्रष्टाचार दुसरा म्हणतो तुझा गोळया भ्रष्टाचार मुद्दा कोव्हीड काळात मुरबाड नगरपंचायत मध्ये गाजला होता.ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात भाजपाचा खासदार भाजपाचा आमदार आहे त्यांची सर्वत्र सत्ता आहे.त्यांना महाविकास अघाडीचे मंत्री लोकप्रतिनिधी विरोध करत नाहीत आपआपसात समजोत असे राजकारण सामान्याना घातक ठरत असून वाढत्या तक्रारीकडे सत्ताधारी शासन दुर्लक्ष करतात कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी गाले वाटपात झालेला गैरव्यवहार धान्य घोटाळा गैरव्यवहार बारवी पुर्नवसन घराचे मुल्यांकन घोटाळा नगरपंचायत व्यापारी गाले घोटाळा कामे न करताच काढलेली बिले भ्रष्टाचार कोव्हीड सेंन्टर भ्रष्टाचार नुकसान भरपाइ भ्रष्टाचार नगरपंचायत वस्तू खरेदी इटेंडर मॅनेज घोटाळा वृक्ष लागवड घोटाळा अशा शेकडो घोटाळयाची चौकशी होत नाही कारवाइ होत नाही यावर महाविकास अघाडीने पडदा टाकला आहे.मुरबाड मतदार संघात भाजपाला महाविकास अघाडी घाबरत आहे असे दिसत आहे.

No comments