web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड ग्रामीण रूग्णलयातील वैद्दयकीय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांचा मनमानी कारभार;दिपक हरडला कामावर घेणार नाही तोपर्यंत कामाला हात लावणार नाही - कर्मचारी कामगार वर्ग एकवटले

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

ज्यानी 10 वर्षापासून मुरबाड तालक्यामध्ये दिपक हरड यांनी जनसामान्यांची सेवा केली,शिपार्इ म्हणून कंत्राटदार म्हणून आजू बाजूच्या परिसरासमवेत रूग्णालय स्वच्छ ठेवले कधी कुठली चूकी केली नाही,आपल्या कामावर रूजू राहून तंतोतंत कर्तव्य बजावले गेले.याच मुरबाड ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर फिजीशियन व एम.एस नसल्याने मुख्यमंत्री यांना शेलार कुटूंबीयानी निवेदन देऊन याच ग्रामीण रूग्णालयाला वैद्दयकिय अधिक्षीक आणून दिला होता.तेव्हा सदरहू विषयाची गंभीर दखल आरोगय् विभाग मंत्रालयाचे उपसंचालक गौरी राठोड व ठाणे जिल्हाचिल्यचिकित्सक यांनी घेऊन कोरोना कालावधीत दौडे यांची नियुक्ती मुरबाड ग्रामीण रूग्णालयात केली असता त्याचबरोबर एम.एस म्हणून जागी डॉ.वाठोरे यांना चार्ज दिला.डॉ.वाठोरे यांनी अलीकडे कोरोना कालावधीत कोरोना हॉस्पीटलमधील कंत्राटी मुलांना झाडे तोडायला लावली तेव्हा हा विषय खूपच गाजला असताना आपल्या मनमानी पुन्हा डॉ.वाठोरे हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.आज दि.05/03/2021 रोजी याच ग्रामीण रूग्णालयात एकनिष्ठेने काम करणरे दिपक हरड यांना तोंडी सांगून थेट कामावरून काढले असल्याचे कळून येत आहे.कोणतीही पुर्वकल्पना ठाणे विभागाकडून न येता कोणतीही नोटीस तथा त्या कर्मचार्‍याची चूकी नसताना कामावर काढून टाकल्याने एकच खळबळ माजली असून आपल्या पदाचा गैरवापर केला आहे.त्या गैरवापरामुळे रूग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी एकत्रित येऊन आपल्या हातीतील काम खाली सोडून दिले असून जोपर्यंत दिपक हरड यांना कामावर रूजू करत नाही तसेच त्यांना कामावर काढून का टाकण्यात आले नाही यचे कारण दाखवित नाही तोपर्यंत एकही कर्मचारी कामाला हात लावणार नाही असे एकमेव संपाला सुरूवात करण्यात आली आहे.

         मुरबाडमध्ये ग्रामीण रूग्णालयामध्ये हजारो नागरिक उपचारासाठी येत असतात त्यांना मदत करण्यासाठी दिपक हरड हे कर्मचारी बरोबर माणूसकी जपणारे ठरले असून अशा कर्तव्यपरायण आणि कधीही कोणास न दुखावणार्‍या मदतनीस व्यक्तीवर मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांनी आपल्या पदाचा आणि खुर्चिचा गैरवापर सर्वसामान्य असलेला कर्मचारी यांचेवर आजमवला आहे.आज मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दिपक हरड यांना लेखी आदेश न करता कामावरून काढले असून सिनियरीटी प्रमाणे त्यांना कामावर रूजूच ठेवणे आहे त्यांना कामावर काढण्यासाठी आदेश आणि कारणास्तव चूकी दाखविणे आहे परंतू तसे काही केले गेले नसल्याने दिपक हरड यांनी डॉ.वाटोरे यांन आपली चूकी काय कि जेणे करून आपण मला लेखी आदेश न देता आणि कोणतीही चूकी न करता काढत आहात त्यावर वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांनी तु मला काही सांगू नकोस जा आणि सी.एस. यांचेकडून ऑर्डर माझ्या समोर आण असा कोणतातरी रोष डॉ.वाठोरे यांनी काढला.वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांनी दिपक हरड यांचेवर अन्याय केला आणि दिपक हरड उदारनिर्वाह साधन हिरकावून घेतले.अशा अन्यायाकडे आता श्रमजिवी संघटना,सामाजिक संघटना आंदोलने छेडणार असून दिपक हरड यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळवून देण्यासाठी पाठिशी उभी राहिली आहेत. दिपक हरड यांच्या कुटूंबाच्या उदारनिर्वाहाचे थोडे असणारे साधन डॉ.वाठोरे यांनी हिसकावून घेतले असून आता सर्व मुरबाड ग्रामीण रूग्णालय कर्मचारी कामगार वर्ग एकवटले आहेत तसेच दिपक हरड यांना जोपर्यंत कामावर घेणार नाहीत किंवा त्यांना कामावर रूजूचे आदेश मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही कामाला हात लावणार नाही असा इशाराही कर्मचार्‍यांनी कर्मचारी दिपक हरड यांचे बाजूने लावला आहे.

         तसेच सदरहू विषय विधानभवनात घेऊन लेखी आदेश न देता तोंडी सांगून कर्मचार्‍याला कामावरून काढणार्‍या वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांना तात्काळ निलंबीत करून त्यांचे पेंशन थांबविण्यात यावे अशी मागणी सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री,उपसंचालक आरोग्य विभाग यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच ठाणे जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक यांनांही सविनिय विषय निवदेनाद्वारे मागणीपत्र देऊन मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी करणारे वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांना तात्काळ निलंबीत करावे असे लेखी निवेदन देण्यात आले आहे.कोणत्याही प्रकारे कारवार्इ न करता अथवा मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.वाठोरे यांना तात्काळ निलंबीत न केल्यास अमरण उपोषण,आत्मदहन करणार असल्याचा इशारा कर्मचारी दिपक हरड यांनी आमच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शासनाला दिला आहे.

No comments