web-ads-yml-728x90

Breaking News

विद्युत तारांमुळे आदिवासींची घरे जळून खाक चौकशी करून संबधितावर कारवाई करा - सभापती श्रीकांत धुमाळ

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे

मुरबाड तालुक्यातील मोहरई कातकरी वस्तीतील आदिवासींची घरे चळून खाक झाल्याची घटना दिनांक 15 मार्च 2021 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.सुरेश वाघे ,बाळू वाघे व शिवा वाघे असे पिडीत कुटूंबांचे नावे असून त्यांच्या घरावरून महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहाच्या तारा गेल्या आहेत.जीर्ण अवस्थेत असलेल्या तारांमुळे स्पार्किंग होऊन  येथील आदिवासी बांधवांच्या घराचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.याबाबत सदर घटनेची पाहणी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी केली असुन वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करून संबधित अधिकार्‍यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मांगणी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी केली आहे.

No comments