0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून पारदर्शकता व उत्तरदायित्व या आधारे सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान विभागाने ई -ऑफिस, नगरपालिका व महानगरपालिकांकडून आकारले जाणारे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली, हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम व डाटा मानकीकरण हे नागरिकांना सुलभ प्रक्रियेद्वारे सेवा देणारे पाच पथदर्शी प्रकल्प  येत्या सहा महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक झाली. सर्व विभागांनी ‘ई -ऑफिस’ प्रणालीचा अवलंब करावा यासाठी या प्रणालीची माहिती व महत्त्व सांगणारे प्रात्यक्षिक व सादरीकरण माहिती तंत्रज्ञान विभागाने सादरीकरण करावे. ई -ऑफिसमुळे पारदर्शकता व उत्तरदायित्व कसे येणार यासंदर्भात माहिती द्यावी. एक फाईल तयार करून त्याची हालचाल कशी होणार त्याचे प्रात्यक्षिक द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

 

Post a comment

 
Top