web-ads-yml-728x90

Breaking News

मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करू - बाळारामभाऊ भोईर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे

काही दिवसांपुर्वी आदिवासी वाडया पाडयातील विविध प्रश्‍नांच्या मागण्या मांडून आंदोलनाचा इशारा श्रमजिवी संघटनेने दिला होता त्यावेळी मुरबाड तहसिलदार अमोल कदम यांनी आपण आंदोलन न करता शिष्ट मंडळांसमवेत येऊन चर्चा करून विविध मागण्यांची दखल घेऊ असे सांगून विनंती केली असता त्या विनंती चा मान ठेवून श्रमजीवी संघटनांनी संबंधित सर्व मुख्य अधिकारी यांना बोलवून घेऊन शिष्ट मंडळाच्या चर्चेस उपस्थिती राहण्याचे तहसिलदार यांना कळविण्यात आले असता मुरबाड तहसिलदार यांनी आपण संबंधित अधिकारी वर्गांनी संपुर्ण माहितीनिशी उपस्थित राहण्याचे पत्रव्यवहार तात्काळ करणार असल्याने श्रमजीवी संघटनांनी आंदोलनाला तुर्तास स्थगिती दिली.त्यानुसार मुरबाड तहसिलदार यांनी संबंधित जिल्हापरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,पंचायत समिती,वनविभाग,महसूल विभाग,नगरपंचायत विभाग,एम.इ.सी.बी,एम.आय.डी.सी विभाग,रेशनिंग विभागातील व अन्य संबंधित विभागातील मुख्य अधिकारी यांना पत्रव्यवहार करून 19/03/2021 रोजी सर्व माहिती सह हजर राहण्याचे कळविले होते त्यानुसार काही संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती तर काही अधिकारी गैरहजर राहिल्याने त्यांचे विभागातील कर्मचारी,अधिकारी यांना पाठविण्यात आले होते.यावेळी विविध मागण्यांसाठी श्रमजिवी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बाळाराम भोईर ,अशोक सापटे(अध्यक्ष ठाणे जिल्हा),संगिता भोमटे(उपाध्यक्ष ठाणे जिल्हा),प्रमोद पवर(उपाध्यक्ष ठाणे जिल्हा),राजेश चन्ने(सरचिटणीस ठाणे जिल्हा),दशरथ भालके(सरचिटणीस ठाणे जिल्हा),सुरज राजपुत(शेतकरी सचिव ठाणे जिल्हा),पंकज वाघ(मुरबाड तालुकाध्यक्ष),महेश वाघ(सचिव मुरबाड तालुका),दिलीप शिद(उपाध्यक्ष मुरबड तालुका),अलका वाघमारे(उपाध्यक्ष मुरबाड तालुका),कुंदा पुंजारा(महिला प्रमुख मुरबाड तालुका),संतोष फसाळे(कातकरी प्रमुख मुरबाड तालुका),सविता मुकणे(सेवादल प्रमुख मुरबाड तालुका),दिनेश नंदकर(शेतकरी प्रमुख मुरबाड तालुका) यांच्यासह सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी मागण्यांमध्ये आदिवासींना रेशनिंग तसेच रेशन कार्ड ऑनलाईन ऑफलाईन धान्य,रॉकेल,रस्त्याची कामे नाहीत,पुलाचे काम नाही,पाणीपुरवठा,आरोग्य सेवा,वीज तारा जीर्ण पोलांचे प्रश्‍न,मीटर नविन देणे,स्मशानभूमी,गावठाण जमीनीवर बिगर आदिवासींनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई,घरकूल योजना,मुरबाड एम.आय.डी.सी मधील कंपनीमध्ये स्थानिक म्हणून आदिवासी व बिगर आदिवासी सुशिक्षीतांना काम असे अनेक विषय या निवेदन मागण्यांमध्ये मांडण्यात आले होते.यावेळी मुरबाड तहसिलदार अमोल कदम हे प्रशासकीय असल्याने सर्व मागण्या त्यांचे समोर मांडून तात्काळ दखल घेण्याची मागणी केली असता भरकटलेल्या विकास वाराला आमच्या आदिवासींच्या वस्तीमध्ये वळायची काळाची गरज असल्याचे यावेळी श्रमजिवी संघटनेचे बाळाराम भोईर यांनी आपल्या भाषेत मांडले.त्याचबरोबर 20 दिवसात पाणी व गावठाण तसेच पुलाचे काम,न झाल्यास सर्व श्रमजिवी पदाधिकारी हे आपले कुटूंबाबरोबर सर्व सामानासोबत मुरबाड तहसिलदार कार्यालयात येऊन राहितील असा इशारा ही बाळाराम भोईर यांनी दिला.

 

No comments