web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई महापालिकेने मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबई महापालिकेने मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात वरळीतील एका मालमत्ता कर धारकाला कारवाईचा बडगा दाखवण्यात आला. त्यानंतर संबंधित मालमत्ता कर धारकाने तातडीने 28 वर्षांपासून थकीत असलेला साडेतीन कोटींचा थकीत मालमत्ता कर जमा केला आहे

1992 सालापासून थकबाकी

मुंबईच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यक्षेत्रातील वरळी परिसरात ‘मे. नॅशनल कॉटन प्रॉडक्ट’ या नावाने कर निर्धारित असलेल्या 6 व्यवसायिक गाळ्यांचा मालमत्ता 1992 सालापासून थकीत होता. त्याची रक्कम 3 कोटी 61 लाख 47 हजार 38 रुपये इतकी होती. या अनुषंगाने कर निर्धारक आणि संकलक खात्याद्वारे धडक कारवाईचा बडगा दाखवण्यात आला. त्यानंतर संबंधितांद्वारे 3 कोटी 22 लाख 52 हजार 459 रुपये एवढ्या रकमेचा धनादेश महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.

No comments