web-ads-yml-728x90

Breaking News

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात रहाणे ऐच्छिक ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून ग्रामीण क्षेत्र, तसेच शहापूर, मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते 12 विचे केवळ आदिवासी विकास विभागाची वस्तीगृह, सर्व आश्रमशाळा, तसेच समाजकल्याण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व वस्तीगृह व निवासी शाळा दिनांक २२ मार्च २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देतानाच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात रहाणे ऐच्छिक असल्याचे म्हटले आहे.१० मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकात अंशतः बदल करून वरील आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहणार आहे. या आदेशाची अमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

No comments