web-ads-yml-728x90

Breaking News

परप्रांतीय स्थलांतरित पात्र लाभार्थ्यांना ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत अन्नधान्य प्राप्त करण्याचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबई शहर व उपनगरामध्ये राहणाऱ्या सर्व परप्रांतीय स्थलांतरित  पात्र लाभार्थ्यांनी ‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून देय अन्नधान्य प्राप्त करुन घेण्याचे आवाहन शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा संचालक कैलास पगारे यांनी केले.मुंबई शहरामध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत आंतरराज्य पोर्टेबिलिटी संदर्भात जनजागृती अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत (डब्लू एफपी) देशातील आंतरराज्य स्थलांतरितांची संख्या प्रामुख्याने जास्त आहे, अशा सात शहरांमध्ये “एक देश एक रेशन कार्ड” योजनेअंतर्गत आंतरराज्य पोर्टेबिलिटी  संदर्भात जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणाऱ्या शहरामध्ये मुंबई शहराचा समावेश करण्यात आलेला आहे.

No comments