web-ads-yml-728x90

Breaking News

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठीचा कृती आराखडा ७ दिवसांत सादर करण्याचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत पर्यावरणमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. नागपूर, भंडारा, कामठी, कन्हान, मौदा, पवनी येथून निघणाऱ्या प्रत्येक नाला, नदी यांचे मॅपींग करुन, छोटे नाले व ते मिळणाऱ्या नद्या असे वर्गीकरण करुन प्रत्येक ठिकाणाहून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत रोड मॅप तयार करावा, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीबाबत सविस्तर कृती आराखडा तयार करण्याबाबत यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सूचना केल्या.बैठकीस नगरविकासमंत्री श्री.एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

 

No comments