0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी दि. 9 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे  आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिली आहे.सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. तसेच ज्यांना पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती. इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणेसाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यक असते. परंतु अनेक विद्यार्थी व पालकांना वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा, कधी करावा याबाबत माहिती नसते. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळी त्यांचीं गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.त्याचप्रमाणे जे अधिकारी/कर्मचारी शासकीय नोकरीत आहेत त्यांचेसाठीसुध्दा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जात वैधता प्रमाणपत्राचे सुलभीकरण व्हावे व अर्जदारांना लवकरात लवकर वैधता प्रमाणपत्र मिळावे व कामकाजात पारदर्शकता यावी या करिता शासनाने ऑगस्ट, 2020 पासून ऑनलाईन सुविधा सुरु केलेली आहे. परंतु बरेच अर्जदारांना ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती नाही. याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांनी दि. 9 मार्च, 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता Zoom अॅपद्वारे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केलेले आहे.

 

Post a comment

 
Top