web-ads-yml-728x90

Breaking News

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या सणावर कोविड – १९ चे सावट असल्याने घरातच राहून हे सण साजरे करा व याबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकाना होळी, धूलिवंदन व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.होळी किंवा शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी 28 मार्च 2021 रोजी होळीचा सण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता, सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते, परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे श्री.  वडेट्टीवार यांनी सांगितले.

No comments