web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ई-प्रॉपर्टी कार्ड ॲपचे लोकार्पण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभागांतर्गत जमिनींची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) आणि भू-कर क्रमांकनिहाय जमिनीचा तपशिल जमीनधारकांना आता घरबसल्या मोबाईल ॲपवर पाहता येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने ई-प्रॉपर्टी कार्ड (ePropertycard) हे ॲप नागरिकांसाठी विकसित केले असून या ॲपचे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी लोकार्पण केले. या ॲपची सुविधा मुंबई शहर जिल्ह्यासाठी असून पुढील काळात संपूर्ण राज्यासाठी ॲप उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना किंवा जमीनधारकांना जमिनीचा नकाशा, सीटी सर्व्हे क्रमांक, जमिनीचे क्षेत्र आणि प्रकार, करनिर्धारणा तसेच जमीनधारकाची माहिती कळेल. हे ॲप सर्वसामान्यांसाठी उपयोगी ठरणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्मित केलेल्या या ॲपचा नागरिकांनी उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी यावेळी केले.

No comments