0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील चंद्रपूर, कणकवली, मालवण व सिल्लोड नगरपरिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध बैठकांच्या माध्यमातून आज आढावा घेतला.एमएसआरडीसीच्या नेपियन सी रोडवरील कार्यालयात झालेल्या या बैठकांना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व भूषण गगराणी आदी यावेळी उपस्थित होते.नगरपरिषदांच्या हद्दीतील विकासकामे वेळेत पूर्ण करताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापन यासारखे प्रकल्प मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Post a comment

 
Top