web-ads-yml-728x90

Breaking News

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे (हवाई पद्धतीने) बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा येथील समिती कक्षात यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. एकंदर 4 कोटी रोपे लावण्यात येणार आहेत असे वन विभागाने सांगितले. सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावीवृक्ष लागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  जनतेला आपली वाटेल अशी ही वृक्षलागवड योजना झाली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केली.

भौगोलिक प्रदेश व हवामानानुसार वृक्ष लागवड व्हावी

प्रत्येक भौगोलिक प्रदेशानुसार पावसाळी परिस्थिती व हवामानाची स्थिती,जमीन याचा अंदाज घेऊन व जी  झाडे उपयुक्त आहेत त्याप्रमाणे वृक्षारोपण करण्यात यावे.वृक्षारोपण करताना खरे उद्दिष्ट ठरवून खरेखुरे उद्दिष्ट गाठावे. वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम आखावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

No comments