web-ads-yml-728x90

Breaking News

लातूर महानगरपालिका लगतच्या १५ किमी परिघातील गावांमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करणार – पालकमंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

लातूर महानगरपालिकेमधील शहर वाहतुक बससेवेचा लाभ लगतच्या गावातील विद्यार्थी व नागरिकांना अधिकाधिक मिळावा, महिला व विद्यार्थिनींना मोफत बससेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी लातूर महानगरपालिका लगतच्या 15 की.मी परिघातील गावांमध्ये शहर बस वाहतूक सेवेचा विस्तार करणार असल्याची माहिती लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.लातूरमध्ये महानगरपालिकेमार्फत बस सेवेचा विस्तार करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस लातूर महानगरपालिकेचे पदाधिकारी यांच्यासह एस.टी.महामंडळाच्या प्रतिनिधी श्रीमती जोशी, एस.टी.महामंडळाचे लातूर विभाग नियंत्रक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments