0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मंडळांच्या हजारो कार्यकर्त्यांनी कोरोना काळात समाज हितेशी बनून उत्कृष्ट काम केल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले तसेच गोरगरिबांचे जगणे सुकर झाले. कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळांनी यापुढेही तन्मयतेने काम करावे व  यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.गणेशोत्सवाचे विश्वव्यापी संघटन असलेल्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील ३० कोरोना योद्ध्यांचा राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, उपाध्यक्षा मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार आणि महासंघाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, समाज आहे म्हणून आपण आहोत. समाजात आपण जे काही कार्य करतो ते समाजाच्या पाठबळावरच आपण समाजासाठी काम करणे गरजेचे आहे. परोपकारासाठीचे जीवन धन्य आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

Post a comment

 
Top