0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे राज्याच्या महसुलामध्ये घट असतानाही शालेय शिक्षण विभागाला विविध योजनांसाठी गेल्या वर्षी 2000 कोटी वरून 2140 कोटींची तरतूद करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला महत्त्व दिले असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारतींची, वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व दुरूस्ती याकरिता तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षित वातावरणात उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आनंददायी वातावरण, द्विभाषिक पुस्तके, ग्रंथालये उभारणी, शारीरिक व क्रीडा विकास, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षांचे कलचाचणी, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकसित करणे. नियमित मुल्यांकन उत्कृष्ट  शिक्षकांचे मार्गदर्शन याद्वारे शाळांचा शैक्षणिक व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Post a comment

 
Top