web-ads-yml-728x90

Breaking News

‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नंदा खरे आणि आबा महाजन यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

साहित्यविश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार नंदा खरे आणि आबा महाजन या मराठी साहित्यिकांना जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला तसेच बालसाहित्यासाठी आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या पुस्तकाला जाहीर झालेला पुरस्कार मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढवणारा आणि युवा साहित्यिकांना प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. साहित्यिक नंदा खरे यांनी हा पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय सविनय जाहीर केला आहे, त्यांच्या निर्णयाबद्दल आदर व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अन्य वीस भाषांमधील साहित्यिकांचेही अभिनंदन केले आहे.

No comments