web-ads-yml-728x90

Breaking News

गतवर्षी मुंबईतील वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेच्या अनुषंगाने ऊर्जामंत्र्यांचे दोन्ही सभागृहात निवेदन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या दि. 12 ऑक्टोबर 2020 च्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातील निष्कर्षांबाबतचे निवेदन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत केले.निवेदनामध्ये माहिती दिली आहे की, गतवर्षी दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10.05 मिनिटांच्या सुमारास मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या 400 के.व्ही. वाहिन्यांमध्ये बिघाडामुळे तसेच मुंबईस्थित वीज निर्मितीचे (Embedded Generation) प्रमाण कमी असल्यामुळे मुंबई महानगराचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबईचे जनजीवन काही तासांसाठी ठप्प झाले होते.या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी ऊर्जा विभागांतर्गत तांत्रिक समितीची स्थापना केली. या समितीत आयआयटी मुंबई, व्हीएनआयटी, नागपूर, व्हीजेटीआय, मुंबईमधील तज्ञ प्राध्यापक तसेच ऊर्जा विभागांतर्गत वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त भारत सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांनीही दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी तज्ञ समितीची नियुक्ती केली. तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) देखील तज्ञ समितीची नियुक्ती केली.

No comments