web-ads-yml-728x90

Breaking News

विवियाना मॉलतर्फे ठाणे महानगरपालिकेकडून (टीएमसी) आणि ठाण्याच्या सन्माननीय महापौरांतर्फे शिफारस करण्यात आलेल्या उपाययोजनांचे अनुपालन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

विवियाना मॉलने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले की ते आपल्या ग्राहकांच्याआरोग्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल बांधील आहेत. ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आणि ठाण्याच्यासन्माननीय महापौरांनी शिफारस केलेल्या उपाययोजनांची कठोर दक्षता आणि अंमलबजावणी करण्यात येतआहे, असे प्रतिपादन त्यांच्यातर्फे करण्यात आले आहे. मॉलचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजनांचीपरिणामकारक अंमलबजावणी करून आणि खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणेपाळण्याची विनंती नागरिकांना करण्यात येऊन ठाण्यातील एक लँडमार्क झालेल्या मॉलतर्फे सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावण्यात येत आहे.ठाणे महानगरपालिकेला (टीएमसी) या मॉलतर्फे कायम मदतीचा आणि सहकार्याचा हात देण्यात येत आहे.ठामपाचे नियम, सॅनिटायझेशन आवश्यकता, सध्या सुरू असलेल्या निर्बंधांचे पालन, सुरक्षितखरेदीपद्धतींविषयी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि रेस्टॉरंट्स काटेकोरपणे ५०% क्षमतेने सुरूठेवणे यांचे अनुपालन मॉलमध्ये करण्यात येते.मॉलतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देताना विवियाना मॉलचे अधिकारी म्हणाले, “ठाणेजिल्ह्यात कोव्हिड १९ च्या फैलावाला आळा घालण्यासाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे (टीएमसी) करण्यातयेणाऱ्या प्रयत्नांना आम्ही पूर्ण समर्थन देतो आणि त्यांच्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा करतो. सध्या ते सामोरेजात असलेल्या आव्हानांची आम्हाला जाणीव आहे आणि ठाण्यातील एक सर्वात मोठा मॉल म्हणून प्रशासनानेसांगितलेल्या सर्व मानक कार्यपद्धतींचे अनुपालन करून आम्ही आमचा सहयोग देतो आहोत आणि समन्वयानेकार्यवाही करत आहोत. आमच्या ग्राहकांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांविषयी जाणीवजागृती निर्माण करून आणिसध्याच्या परिस्थितीबद्दल विश्वासार्ह माहिती अधोरेखित करून आम्ही आमच्या ग्राहकांशी नियमितपणे संवादसाधत आहोत. आमचे कस्टमर्स, रिटेल भागीदार आणि कर्मचारी यांना ते स्टोअरमध्ये असताना सुरक्षितवातावरण मिळावे यासाठी आम्ही आमच्या सॅनिटायझेशनच्या उपाययोजना अपग्रेड केल्या आहेत. आमच्याविजिटर्सनीही सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे याची आम्ही त्यांना विनंती करत आहोत,जेणेकरून आम्ही आमचे आणि आमच्या समुदायाचे संरक्षण करू शकू.”

 

No comments