web-ads-yml-728x90

Breaking News

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, असे मत व्यक्त करत ‘माविम ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’साठी मिळालेल्या स्कॉच पुरस्काराबद्दल महिला व बालविकासमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘माविम’चे अभिनंदन केले.राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानद्वारे ‘माविम’साठी निर्मित ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ ला नुकताच जानेवारीमध्ये ‘स्कॉच अवॉर्ड- सिल्व्हर’ हा देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला होता. या पुरस्काराचे प्रमाणपत्र राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानाचे संचालक संजीव जाधव यांनी महिला व बालविकासमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर केले. त्याचबरोबर ‘नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची पुनर्रचना’ याबाबतचा अहवालही ॲड.ठाकूर यांना सादर करण्यात आला.

No comments