0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मानसुख हिरेनचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, मानसुख हिरेनच्या जीवाला धोका असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले होते. प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत भारतीय मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर गुरुवारी सायंकाळी काळ्या रंगाची बेवारस कार आढळून आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) या कारची सखोल तपासणी केली. यात जिलेटीनच्या 20 कांड्या आढळून आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.रात्री 1 वाजताच्या सुमारास ही कार येथे पार्क करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फूटेजवरून समोर आले आहे. तसेच त्यानंतर या कारमधील काही लोक दुसऱ्या एका कारमध्ये बसून या परिसरातून बाहेर गेल्याचे समोर आले.

Post a comment

 
Top