0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

सर्वांना अभिमान वाटेल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उंचीला साजेसं असं स्मारक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून उद्या दि.31 मार्च रोजी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.याबाबत माहिती देताना मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, सायंकाळी साडेपाच वाजता महापौर निवास, दादर, येथे हा कार्यक्रम होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

Post a comment

 
Top