web-ads-yml-728x90

Breaking News

घोड्यावर येण्याच्या परवानगीचे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - नांदेड

पाठीचा कण्याच्या दुखण्यामुळे घोडा खरेदी करण्याची आणि त्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे रोहयो विभागात सहायक लेखाधिकारी पदावर कार्यरत असलेले सतीश पंजाबराव देशमुख यांनी केली होती, परंतु अखेर देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची आपली मागणी मागे घेत, माफीनामा सादर केला आहे.घोड्यावर येण्याच्या परवानगीचे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारची विनंती करणाऱ्या पत्राबाबतच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी देखील दुजोरा दिला. तर, सतीश देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.दरम्यान, आपण ऑफिसला येताना घोड्यावर येण्याचा विचार करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मला घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक लेखाधिकारी असणाऱ्या सतीश देशमुख यांनी केली होती. ३ मार्च रोजी हे पत्र लिहिण्यात आलं आहे. “कार्यलयीन परीसरामध्ये घोडा बांधण्याची परवानगी मिळण्याबद्दल’, असा या पत्राचा विषय आहे.

No comments