web-ads-yml-728x90

Breaking News

श्रीकांत मोघे यांच्या निधनाने ज्येष्ठ रंगकर्मी गमावला

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गेल्या सहा दशकांपासून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनाने ज्येष्ठ रंगकर्मी गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.शालेय शिक्षण घेत असतानाच  नाट्यअभिनयाकडे वळलेल्या श्रीकांत मोघे यांनी साठपेक्षा अधिक नाटके आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला, त्यांची अनेक नाटके, चित्रपट लोकप्रिय ठरली.  वयाच्या तिशीमध्ये असताना ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील ‘श्याम’ या व्यक्तिरेखेने श्रीकांत मोघे यांना रंगभूमीवर ओळख दिली, त्यानंतरच्या काळात त्यांनी विविध भूमिका साकारल्या, ‘वाऱ्यावरची वरात’ यातील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली, नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या श्रीकांत मोघे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचीही भावना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

No comments