web-ads-yml-728x90

Breaking News

कथाकथनास शालेय शिक्षण विभाग प्रोत्साहन देईल – ‘कथांची शक्ती’ कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्वासन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुलांची क्षमता वाढविण्यासाठी त्यांचे उत्तम संगोपन व त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि कथाकथन हे मुलांची सकारात्मक वाढ आणि विकासाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. शिक्षण विभाग याला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रातील शाळकरी मुलांमध्ये उत्साही वाचन संस्कृती निर्माण करणे याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देण्यात येत आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधून आयोजित ‘गोष्टींचा शनिवार’ या कथा वाचनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) युनिसेफ आणि प्रथम बुक्स  स्टोरी वेव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित केला.महाराष्ट्रातील मुलांकरिता शाळाबंदीच्या कालावधीत विस्तार झाल्यामुळे मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी तसेच त्यांच्या भाषा कौशल्यात सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनाने पूरक असा ‘गोष्टींचा शनिवार’ हा उपक्रम गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे.या कार्यक्रमात 2.6 लाख शिक्षक आणि अंगणवाडी सेवक, राज्यभरातील एक लाख शाळा आणि अंगणवाड्यांनी सहभाग घेतला. याचा राज्यातील 25 लाख मुलांनी लाभ घेतला. ‘आनंद आणि भाषा कौशल्यासाठी वाचन’ या विषयावर पॅनल चर्चेचेही आयोजन करण्यात आले.

No comments