web-ads-yml-750x100

Breaking News

आयआयटी दिल्ली येथील गणिताचे प्राध्यापक डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ.राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.दि.७ सप्टेंबर २०२० रोजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.डॉ.राजेंद्र कुमार शर्मा (जन्म २० नोव्हेंबर १९५८) यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रान्स व जर्मनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ.शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २००२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.

No comments