web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी तहसिलदार अधिक पाटील यांच्या बेधडक कारवाईने रेती,माती,डोंगर फोडयांत धडकी;महासुलात वाढ सामान्याना दिलासा

 


BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी,ठाणे

गेले काही वर्षापासुन खदाणी रेती माती दगड रॉयल्ट्री चोरटे डोंगरफोडे गोडावून धारक यांच्या महसुल चोरीत वाढ झाली होती अनेक जण राजकीय आश्रयाने लाखो रूपये शासनाचा महसुल बुडवत होते त्यांना भिवंडी तहसिलदार अधिक पाटील यांनी दणका दिला आहे.ठाणे येथुन भिवंडी तहसिलदार पदभार घेतल्यानंतर प्रथम नजर रॉयल्ट्री चोरी करणार्‍या अवैध दगडखाणी,माती,रेती,दगड वाहातुक करणार्‍या ट्रक चालकावर कारवाई करून त्यांच्या मालकाच्या मनात धडकी भरवली.भिवंडी तालुका तसा गोडावुन निर्मित तालुकामात्र येथे गोडावुन बांधकाम रस्ते यासाठी शेकडो कोटीची उलाढाल होते त्यातच कोटी रूपायाची रॉयल्टी चोरी होते.भादाणे तळवली वाशेरे अर्जुनली तर्फे सोनाळेच्या हद्दीत मोठया प्रमाणात शासनाच्या महसुली जागेत अवैध दगडखाणी चालवणार्‍यानी 100 कोटीच्यावर शासनाची रॉयल्ट्री बुडवली आहे.त्यांच्या तक्रारी स्थानिकानी मंत्री अधिकार्‍यांकडे केल्या असताना कारवाई झाली नाही.वनविभाग खाजगी डोंगरफोडुन गोडावुनची निर्मिती करणार्‍यानी आपलं वलय दादागिरीतुन उभं केलं आहे.स्थानिक संबधित अधिकारी कारवाई करण्यास टाळा टाळ करतात शासनाला खोटे आहवाल देतात त्याकडे तहसिलदार अधिक पाटील नायब निवासी तहसिलदार गोरख फडतरे त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचार्‍यानी रॉयल्ट्री चोरटयावर धडक कारवार्ई करून दोन कोटीच्यावर महसुल जमा करण्याचा संकल्प केला असुन अनेकावर दंडात्मक कारवाई करून काही गोडावुन सुध्दा सिल केले आहे.दुसरीकडे सामान्य जनतेची कामे शालेय दाखले शासनाच्या योजना कोरोना प्रतिबंध उदयोजना शासकीय कर्तव्य कामे पार पाडण्यात यशस्वी वाटचाल सुरू केल्याने सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments