BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांच्या अधिपत्याखाली आज ७०० ते ८०० महाविद्यालये संलग्न आहेत. अशावेळी विद्यापीठांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. त्याउलट लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचे व्यवस्थापन सूलभ पद्धतीने होत असून त्याठिकाणी गुणवत्ता राखणे तसेच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणे शक्य होते. राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठे तयार केल्यास अशी लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे निश्चितच सर करतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.नव्याने सुरु झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री.कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झाली.बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, कुलगुरू डॉ. दिनेश पंजवानी, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र व विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
Post a comment