web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी तहसिल कार्यालयात महिला दिन साजरा तहसिलदार अधिक पाटील यांनी केला महिलांचा सत्कार

BY - गौरव शेलार , युवा महाराष्ट्र लाईव - भिवंडी

आज जागतिक महिला दिन (International Women’s Day) दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो.

 यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. आज महिला स्वत:ला चांगल्या प्रकारे व्यक्त करु शकतात. अशाच कतृत्व महिलांचा सत्कार भिवंडी तहसिलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयात करण्यात आला. यावेळी महिला वर्गानी निर्भीडपणे भाषणे केली. यावेळी भिवंडी तहसिलदार अधिक पाटील, नायब तहसीलदार गोरख फडतरे , पोलीस अधिकारी प्रियंका चौगुले,सभापती,उपसभापती,समाजसेविका व कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थिति होते.

No comments