0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील महापौर निवासातील स्मारकाच्या भूमिपूजनचा मुहूर्त अखेर ठरला. बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन ३१ मार्च रोजी होणार असल्याचे माहिती सध्या आता मिळत आहे. यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. हे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आँनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोना निर्बंध नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळील जुने महापौर निवासाच्या जागेत होणार आहे.या कार्यक्रमासाठी सरकारने विशेष परवानगी घेण्यासाठी कार्यवाहीसुद्धा सुरु केली आहे. या स्मारकाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरीला चालना मिळाली होती. त्यानंतर आताच्या ठाकरे सरकारमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे या स्मारकाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

Post a comment

 
Top