0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीत ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये सहा विधेयके संमत करण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यावेळी उपस्थित होते.

Post a comment

 
Top