web-ads-yml-728x90

Breaking News

बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ केल्यामुळे अनाथ बालकांना कौटुंबिक वातावरण मिळण्यासाठी प्रोत्साहन- महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अनाथ, निराश्रीत, बेघर किंवा अन्य कारणाने अडचणीमध्ये असलेल्या मुलांना संस्थांमधे ठेवण्याऐवजी कौटुंबिक वातावरणात ठेवावे यासाठी महिला व बालविकास विभागाकडून बाल संगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेत पालकांना आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अशा बालकांना कौटुंबिक वातावरणात ठेवण्यासाठी अधिक कुटुंबे पुढे येतील, अशी आशा महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.बाल संगोपन योजनेच्या सहायक अनुदानात वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देताना मंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या.

No comments