24 तासाच्या आता एटीएम चोरांना बेडया मुरबाड पोलिसांचे सर्वत्र कौतुक
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे
मुरबाडच्या एसबीआय बँकेच्या एटीएममधुन सुमारे 45 लाख रूपये चोरी झाल्याची घटना 25 मार्च 2021 रोजी मुरबाडमध्ये उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात सदर आरोपीना जेरबंद केले होते या घटनेची माहिती देण्यासाठी मुरबाड पोलिस स्टेशनमध्ये आज दिनांक 29 मार्च 2021 रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.मुरबाड सोनारपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये ग्राहक पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी शाखेशी संपर्क साधला.त्यावेळी बँक अधिकारी कर्मचारी यांनी अधिक पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला होता.याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले व तात्काळ तपासात सुरूवात करण्यात आली होती.मुरबाड पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीना बेडया ठोकल्या असल्याचे ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.तसेच 24 तासात तपास लावल्याने मुरबाड पोलिस ठाण्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
No comments