web-ads-yml-728x90

Breaking News

संस्थेचा 15 वा वर्धापन दिन आदिवासी बांधवांसोबत.

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – उरण

13 मार्च, 2006 ला ज्यावेळी संस्थेची स्थापना झाली त्यावेळी आपल्या हातून एवढं मोठं काम होईल असं वाटलं नव्हत, वन्यजीवांच्या सेवेसाठी अनेकवेळा मानापमान सहन करून आलेल्या रेस्क्यू कॉल्ससाठी आपण तयार राहिलो. ऊन-वारा-पाऊस, दिवस-रात्र या कशाचाही विचार न करता,प्रसिध्दी च्या मागे न फिरता फक्त समाजातील लोकांच्या, वन्यजीवांच्या आणि निसर्गाच्या मदतीला जायचं आहे हे एकच लक्ष मानून आजवर आपण काम करत आलो. लोकांना आपल्या या कामाची जाण आहे म्हणुन आज सर्वाधिक रेस्क्यू कॉल्स फॉन ला येतात. कारण त्यांना ठाऊक आहे की या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न फक्त फॉन टीमकडूनच होतात असे मत फॉनचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले.

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )ही वन्य जीवांचे, निसर्गाचे संरक्षण करणारी  संस्था चिरनेर, तालुका उरण,जिल्हा रायगड येथे कार्यरत असून फॉन संस्थेच्या 15 व्या वर्धापन दिन प्रसंगी पुनाडे आदिवासी वाडी येथे आयोजित केलेल्या सर्पदंश उपचार व बचाव हा आदिवासी बांधवांसाठी आयोजित माहितीपर कार्यक्रमात अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले. निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव रक्षणासाठी, त्याचप्रमाणे समाजातील कुठल्याही व्यक्तीला सर्पदंश झाला तर अशा रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून साथ दिलीत असे जनतेप्रती कृतज्ञतेची भावना जयवंत ठाकूर यांनी व्यक्त  केली.

          संस्थेच्या SAT (सॅट- स्नेक बाईट ऍक्शन टीम) ने आतापर्यंत (मार्च 2021 पर्यंत) सर्पदंश  झालेल्या 35 रुग्णांना वेळीच प्रथमोपचार व योग्य त्या  रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविले आहेत .विशेष म्हणजे एकही केस दगावली नाही.यात बहुतकरून आदिवासी बांधव आहेत.त्यांचा सगळा खर्च फॉन टीमने उचलला आहे.संस्थेचा 15 वा वर्धापनदिन अगदी साध्या पद्धतीने संस्थेच्या नामफलकाला पुष्पहार घालून व श्रीफळ वाढवून साजरा करण्यात आला.

   या फॉनच्या वर्धापन दिन  कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील व मनीषा पाटील  व उपाध्यक्ष राजेश नागवेकर यांच्या हस्ते नामफलकाचे पूजन करण्यात आले. संस्थेचे वैद्यकीय सल्लागार मनोज भद्रे (प्रमुख वैद्यकीय अधीक्षक-इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय ,उरण)  हे वेळात वेळ काढून वर्धापनदिनासाठी हजर राहिले.संस्थेच्या यशस्वी वाटचालीत केवळ सर्पमित्रांचाच सहभाग नसून सर्व सर्पमित्रांच्या सौभाग्यवतींचाही मोलाचा वाटा आहे असे संस्थेचे मत आहे. फॉन ची नवी पिढी म्हणजे म्हणजे सर्पमित्रांची मुले.ही नवी पिढीही आता प्रत्येक  कार्यक्रमात सहभागी होऊन फॉन ची ऊर्जा वाढवित आहेत.15 व्या वर्धापनदिनी संध्याकाळी पुनाडे आदिवासी वाडीवर सर्पदंश - उपचार व बचाव हा आदिवासी बांधवांसाठी माहितीपर कार्यक्रम सादर करण्यात आला.या प्रसंगी निकेतन ठाकूर, राकेश शिंदे, शेखर म्हात्रे, गोरख म्हात्रे,अनुज पाटील,कदम काका, जितेंद्र घरत,मनोज रावल,अविनाश गावंड,प्रथमेश मोकल,प्रथमेश ठाकूर,ऋषिकेश,स्वप्नील, किशोर आदी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

 

No comments