web-ads-yml-728x90

Breaking News

उपक्रमात कंत्राटी पद्धतीने तृतीयपंथीयांना नोकरीवर सामावून घेण्याचा निर्णय

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - औरंगाबाद

शहरातील तृतीयपंथीयांना समाज प्रवाहात आणण्यासाठी औरंगाबाद महापालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमात कंत्राटी पद्धतीने तृतीयपंथीयांना नोकरीवर सामावून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शहर बस सेवा, तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात आणि विविध उपक्रमांच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तृतीयपंथीयांना नियुक्त्या दिल्या जातील, असे आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले. नुकतीच तृतीयपंथीयांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मदतीचा हात म्हणून एक पाऊल टाकले आहे. यासंदर्भात आपला निर्णय जाहीर करताना पांडेय यांनी सांगितले की, तृतीयपंथी हा घटक नेहमीच समाजात उपेक्षित राहिला आहे. आजही समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना मानाचे स्थान देण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत काही तृतीयपंथीयांना कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेतले जाणार आहे. लवकरच या संकल्पाला अमलात आणले जाईल. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत स्मार्ट बससेवा चालविली जाते. याठिकाणी बसची माहिती देण्यासाठी तसेच इतर कामांची जबाबदारी त्यांना दिली जाईल.

No comments