0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी मुंबई

मैत्रिणीसोबत जवळीक वाढवणाऱ्या तरुणाची इर्षेतून हत्या करण्यात आली. नवी मुंबईत घडलेल्या हत्याकांड प्रकरणी आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात दुरावा वाढल्यानंतर आरोपीने नाशिकहून येऊन तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घणसोली भागातील झाडीत टाकला होता. नवी मुंबईतील तळवली परिसरात राहणारा 19 वर्षांचा अनिल शिंदे पाच फेब्रुवारीला सकाळी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी त्याच्या फोनवरील शेवटचे लोकेशन शोधलं असता नाशकातील तरुणाची माहिती समोर आली.पोलिसांनी 19 वर्षांच्या अनिकेत जाधवला नाशिकमधून ताब्यात घेतले. चौकशीसाठी त्याला पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने अनिलची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने दाखवलेल्या घटनास्थळावरुन अनिलचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

घणसोली गावालगतच्या झाडीत हा मृतदेह टाकला होता. चार दिवसांपासून अनिलचा मृतदेह पडून होता. अनिकेतची मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

 

Post a Comment

 
Top