web-ads-yml-728x90

Breaking News

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

देशातील सर्वात  मोठा नागरी  पुनरुत्थान प्रकल्प आज खऱ्या अर्थाने मार्गी लागत आहे. ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील पात्र 272 भाडेकरू रहिवाश्यांना पुनर्वसन होऊ घातलेल्या इमारतीत त्यांच्या हक्काच्या सदनिकांची निश्चिती करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचे काम शासनाने केले आहे. ज्यामुळे सर्वांचाच बीडीडी पुनर्वसन प्रकल्पाबाबत विश्वास अधिक दृढ होईल आणि हा प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होईल, असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये केले.म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये म्हाडा संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या 272 पात्र भाडेकरूंना वितरित करावयाच्या पुनर्वसन सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीचा शुभारंभ मंत्री श्री.आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, नगरसेविका श्रीमती स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

No comments