web-ads-yml-728x90

Breaking News

४०० हून अधिक हॉटेल्स, पब, बार, रेस्टॉरंटना नोटीसा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीसांनी ४०० हून अधिक हॉटेल्स, बार, पब, मॉल्सला नोटीसा बजावल्या आहेत. गेल्या दोन दिवसापासून ठाण्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महापालिकेनं याची दखल घेतली असून आता कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेनं पोलीसांच्या मदतीनं कारवाईला सुरूवात केली आहे. शहरातील विविध हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पब, मॉल, मंगल कार्यालयं, ढाबे अशा ठिकाणी शारिरीक अंतर नियमाचं पालन होत नसल्याचं दिसत असून याप्रकरणी ४०० हून अधिक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शारिरीक अंतर नियमाचं पालन करावं, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना या नोटीसीमधून देण्यात आल्या आहेत. या नियमांचं पालन न केल्यास अशांवर गुन्हे दाखल केले जाणार असून वेळ आल्यास त्यांना सील ठोकण्याची कारवाईही केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं.

No comments